रत्नागिरीतील मनसे पदाधिकारी व मनसैनिकांचा अखेर मनसेला राम राम…

रत्नागिरी : उद्योग व मराठी भाषा मंत्री, आमदार श्री.उदय सामंत यांच्या वाढदिवसाच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी च्या पदाधिकारी व मनसैनिकांनी शिवसेनेत (शिंदे गटात) मोठ्या संख्येने जाहीर प्रवेश केला.

मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तसेच किरण सामंत उर्फ भैय्या शेठ यांच्या मार्गदर्शनाने व मंत्री उदय सामंत व किरण सामंत छोटू खामकर यांचे जिवलग मित्र दीपक पवार यांच्या सहकार्याने श्री.अनिरुद्ध उर्फ छोटू खामकर, श्री.अजिंक्य केसरकर, अनिल पारकर, मिलिंद पाटील, साहिल वीर, अनंत शिंदे, सौरभ गायकवाड, सुनील पारकर , पांचाळ, अमोल साळवी, संजय आग्रे, ओंकार सिनकर अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनत जाहीर प्रवेश केला.

मनसेतील आंतर्गत वादाला कंटाळून अखेर अनेक मनसैनिक शिवसेनेच्या वाटेवर आहेत असे सांगण्यात आले. काही दिवसात अजून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे शिवसेनेत प्रवेश करतील असे सुद्धा संबण्यात आहे. त्यावेळी सामंत यांनी ही आम्ही तुमच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. तुम्हांला पूर्ण न्याय देऊ असा शब्द दिला आहे.

आपल्या समाजिक कार्याला सुद्धा पूर्ण मदत करून रत्नागिरी हा पूर्ण शिवसेनेचा बालेकिल्ला करू, असे देखील मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेला ही बळ मिळाले आहे. त्यावेळी जिल्हाप्रमुख श्री राहुल पंडित, शहरप्रमुख श्री. बिपीन बंदरकर, सुदेश मयेकर साळवी स्टॉप चे विभागप्रमुख श्री. दीपक पवार व अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 27-12-2024