पावस येथे स्वामी स्वरुपानंदांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

रत्नागिरी : तालुक्यातील पावसमधील स्वामी स्वरूपानंदांचा १२२ वा जन्मोत्सव सोहळा २७ डिसेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित कार्यक्रमात सकाळी ८ वाजल्यापासून अनंत निवास येथून ढोल-ताशांच्या गजरात दिंड्यांनी वाजत गाजत मंदिराच्या दिशेने प्रस्थान केले.

पावस परिसरातील व कोल्हापूर सांगली येथून येणाऱ्या स्वामी भक्तांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. कोल्हापूर, सांगली येथून पायी येणाऱ्या दिंड्यांचा सहभाग असतो. याही वेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वामी भक्तांसाठी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या वतीने भोजन व्यवस्था करण्यात आली होती.

संध्याकाळी साडेसहा वाजता स्वामींच्या जन्म सोहळ्याच्या कीर्तनाला सुरुवात झाली, तर सात वाजून ३९ मिनिटांनी स्वामींचा जन्मोत्सव सोहळा झाला.

या निमित्त रात्री ९ वाजता युवा गायक प्रथमेश लघाटे यांच्या अभंग गायनाचा कार्यक्रम झाला. स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मोत्सवानिमित्त रत्नागिरी तालुका मेकॅनिक असोसिएशनकडून दुचाकी वाहनांची दुरुस्ती मोफत करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

cake of the day

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 28/Dec/2024