रत्नागिरी : शहरातील राजीवडा येथे पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातील १० नागरिक राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. झाडू विकण्याच्या बहाण्याने हे नागरिक इथे वास्तव्य करत आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. परराज्यातील असल्याच्या संशयावरून त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची शहर पोलिसांकडून चौकशी करत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी पुन्हा एकदा संपूर्ण शहर आणि तालुक्यात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
तालुक्यातील नाखरे येथे चिरेखाणीवर १३ बांग्लादेशीय सापडले होते. याची चौकशी केल्यानतंर यांच्याकडे कोणतेही भारतीय नागरिकत्व नसताना आणि अधिकृत कागदपत्र नसताना त्यांचे येथे वास्तव होते. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना बांग्लादेशाला पाठवण्यासाठी शासनाची परवानगी मागवण्यात आली आहे; परंतु अशा प्रकारे बांग्लादेशीय, रोहिंगे आदींचे जिल्ह्यात बेकायेदशीर वास्तव असल्याची माहिती पोलिस दलाकडे आहे. त्यामुळे पोलिस दलाने जिल्ह्यास सर्वत्र अशाप्रकारे काम करणाऱ्या आणि कोणतीही भारतीय ओळख नसणाऱ्यांचा शोध सुरू ठेवला आहे. मनसेने यामध्ये उडी मागली होती. अशाप्रकारे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. यांचा शोध घेऊन आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ, असा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांची शोधमोहीम सुरू आहे.
शहरामध्ये झाडू विकरणारे काही परराज्यातील नागरिक फिरत असल्याची माहिती मनसेला मिळाली. त्यांनी त्यांची चौकशी केली असता असमाधानकारक उत्तरे दिली. भारताचे नागरिक असल्याची ओळख काय आहे, असे विचारल्यानंतर त्यांनी आधारकार्ड दाखवली; परंतु आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांची शहर पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. ते परराज्यातील असून बेकायदेशीर वास्तव्यास असल्याच्या संशय आहे. राजीवडयामध्ये हे दहा लोक राहात असल्याची प्राथमिक माहिती आहे. आणखी काही नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याची टीप मनसेला मिळाली आहे. तोही प्रकार लवकरच उघड होणार असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मनसेच्या इशाऱ्यानंतर ‘ती’ मुलं गायब
शहरातील स्टेट बँक कॉलनीमध्ये परराज्यातील आणि वेगळी भाषा बोलणारी काही मुले राहात असल्याची मनसेची तक्रार आमच्याकडे आली आहे. तिथे प्रार्थनास्थळ चालत असल्याचा संशय होता. याबाबत पोलिस अधीक्षकांनाही मनसेने निवेदन दिले होते; परंतु मनसेच्या इशाऱ्यानंतर तेथील प्रार्थनास्थळ बंद होऊन मुलं गायब झाल्याची माहितीदेखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 28/Dec/2024












