खेड : हजवानी अपार्टमेंटमध्ये वीज चोरी उघडकीस

खेड : खेड येथील हजवानी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या शरफुद्दीन अली तांबे यांच्या विरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मागील बारा महिन्यांपासून त्यांनी अनाधिकृतपणे १९२६ युनिट्स वीज चोरून वापरल्याचा आरोप आहे. त्यामुळे महावितरण कंपनीला सुमारे ५१,५४० रुपयांचे नुकसान झाले आहे. या बाबतची तक्रार खेड शहर महावितरण कंपनी मर्यादितचे सहायक अभियंता वैभव दीपक मोडक यांनी दिलेली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, शरफुद्दीन अली तांबे यांनी आपल्या फ्लॅटमध्ये अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज चोरी करत होते. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:00 PM 28/Dec/2024