भाजप प्रदेश प्रभारीपदी आ. रवींद्र चव्हाण

रत्नागिरी : भाजपचे माजी मंत्री आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे पक्षबांधणीचे कौशल्य लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची संघटन पर्व प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल कोकणसह रत्नागिरी जिल्ह्यामधून आ. रवींद्र चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोकणची जबाबदारी असणार्‍या माजी मंत्री व आ. रवींद्र चव्हाण यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. भाजपसह महायुतीचे उमेदवार विजयी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्यावर भविष्यात राज्यात मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत होती. विधानसभा निवडणुकीनंतर कोकणातील प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली आहे.

त्यांचे हे संघटन कार्य लक्षात घेऊन पक्षाने त्यांना संघटन पर्व प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली असून त्याबाबतचे पत्र दिले आहे. आ. रविंद्र चव्हाण यांच्या निवडीमुळे रत्नागिरीतील भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला असून, कार्यकर्त्यांकडून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 30-12-2024