संगमेश्वर : नुकत्याच पुणे येथील बालेवाडी येथे “सक्सेस अँबॅकस अॅन्ड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या तर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीयस्तरावरील अॅबॅकस स्पर्धेत भाग घेऊन उत्तुंग कामगिरी दर्शवत गार्गी गौरी घनश्याम घडशीने एक लाखाची शिष्यवृत्ती मिळवली आहे. अडीच हजार विद्यार्थ्यांमधून तिने स्वतःला सिद्ध केले आहे.
बालपणापासून कांही मुलांच्या अंगी काही उपजत चांगले गुण असतात. हुशारी, चातुर्य, तर्कशुध्द, अंदाज, पाठांतर, उत्तम स्मरण, खेळात, अभ्यासात आवड अशा गुणांचा योग्य वेळी विकास झाला तर अशी मुले प्राथमिक शिक्षणापासूनच पालक, शिक्षक, मार्गदर्शन व स्वतःची जिद्द ठेवून पुढे वाटचाल करतात.
त्यामध्ये गार्गी गौरी घनश्याम घडशी हीचा समावेश आहे. गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथे सहावीत शिकत आहे. गार्गी अशा स्पर्धेत नेहमीच भाग घेऊन अभ्यासाचे सातत्य राखत असते.
या पुरस्कार सोहळ्यासाठी जग प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, अभिनेते स्वप्निल जोशी, सक्सेस अबॅकसचे मुख्य सीईओ किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. गार्गी ही पेन्शन फायटर घनश्याम पाटील यांची कन्या असून मुलीही कोणत्याही क्षेत्रात मागे नसतात हे सिद्ध करून दाखवले आहे. तिच्या उत्तुंग यशाबद्दल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 30/Dec/2024














