रत्नागिरीत उबाठाला मिळणार मोठा धक्का; एक मोठा नेता भाजपच्या वाटेवर

रत्नागिरी : उबाठा’तील आमदार राहिलेला एक उपनेता दर्जाचा पदाधिकारीही आपली निष्ठा बाजूला ठेवत लवकरच हाती भाजपचे कमळ घेण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसातच हा मोठा प्रवेश होणार असून, त्याचा मोठा धक्का उबाठाला बसणार आहे.

राज्यपाल पुरस्कृत आमदारकीची माळ या पदाधिकार्‍याच्या गळ्यात पडण्याची शक्यताही चर्चिली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाला एक आक्रमक चेहरा असावा, यासाठी भाजप कडून हालचाली सुरू असल्याची चर्चाही कार्यकर्त्यांमध्ये आहे.

एका बाजूने नामदार उदय सामंत आणि त्यांचे बंधू आमदार किरण सामंत यांनी रत्नागिरी आणि राजापूर मध्ये उबाठा ला अक्षरशः सुरुंग लावला आहे. येत्या काही दिवसातच उबाठा माधील अनेक नेते हे शिंदे गटात जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर जोरदार बैठकांचे सत्र सुरु आहे. त्यातच उबाठा मधील एक बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक बीजेपीच्या वाटेवर असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच हे प्रवेश होणार असल्याचे आता बोलले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:35 30-12-2024