लांजा : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थार कार 50 फूट दूर फरफटत जाऊन संरक्षक कठड्यावर जाऊन धडकल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. हा अपघात सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर देवधे येथील आसगे फाटा नजीक घडला.
या घटनेत थार कार ( क्र. एम. एच. 01, ईबी- 7671) मुंबई येथून सिंधुदुर्ग-कुडाळ च्या दिशेने निघाली होती. भरधाव असणार्या कार अपघाताचा थरार एव्हढा भयावह होता की, कार महामार्गावर 50 फूट फरफटत जाऊन दोनवेळा कलंडली. यामुळे कारच्या पुढील व मागील बाजूचे नुकसान झाले. चालकाला किरकोळ दुखापत झाली. मुंबई येथून कुडाळच्या दिशेने ही कार निघाली होती. ती देवधे येथे आली असता भरधाव असणार्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
कारमध्ये एकूण चारजण प्रवास करत होते. या अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. मोठा अपघात होऊनही सुदैवाने चारही प्रवासी बचावले. मार्गावरून ये-जा करणार्या प्रवाशांनी अपघातग्रस्ताना मदतकार्य केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 31-12-2024














