देवरुख : रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशन व संगमेश्वर तालुका खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ, सोनवडे संचलित माध्यमिक विद्यालय, सोनवडे व आजी-माजी विद्यार्थी माध्यमिक विद्यालय, सोनवडे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन माध्यमिक विद्यालय, सोनवडे येथे करण्यात आले होते.
जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेतील १४ वर्षाखालील गटात संगमेश्वर- अ आणि खुल्या गटात संगमेश्वर-ब संघाने अंतिम विजेतेपद प्राप्त करून संगमेश्वर तालुक्याला निर्विवाद यश प्राप्त करून दिले. या स्पर्धेमध्ये लांजा तालुक्यातील अधिक संघांचा सहभाग लाभला. स्पर्धेचे उद्घाटन अनंत मांडवकर व दत्ताराम शिंदे यांनी केले. याप्रसंगी संदीप तावडे, डॉ. सदानंद आग्रे, पंकज चवंडे, सचिन लिंगायत, संस्थाध्यक्ष प्रभाकर सनगरे, अनिल नांदळजकर, नवनाथ खामकर, पूजा उबारे, श्रद्धा गुरव, वसंत इंदुलकर, दत्तात्रय खातू, रवींद्र बासुरकर, शंकर धामणे यांच्यासह प्रशालेचे आजी-माजी विद्यार्थी आणि खो-खोप्रेमी नागरिक उपस्थित होते.
यामध्ये १४ वर्षाखालील मुले स्पर्धेत प्रथम क्रमांक संगमेश्वर-अ संघ, द्वितीय क्रमांक तळवडे, लांजा-अ, तृतीय क्रमांक लांजा हायस्कूल, लांजा. व चतुर्थ क्रमांक राजापूर-अ संघाने मिळवला. खुला गट मुले प्रथम क्रमांक संगमेश्वर-व, द्वितीय क्रमांक सनगलेवाडी, संगमेश्वर, तृतीय क्रमांक कणगवली, लांजा-अ, व चतुर्थ क्रमांक विलवडे, लांजा.
या स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम चार क्रमांकांना व वैयक्तिक पुरस्कार प्राप्त खेळाडूंना चषक आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून समीर काबदूले, कृष्णा करंजळकर, सुशील वासुरकर, आकाश सोळंकी, पांडुरंग पेडणेकर, विजय कलकुटकी, समीर खोमणे, प्रशांत देवळेकर आणि अभिजीत कदम यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शेखर गुरव, प्रीतेश भूरवणे, प्रतीक गुरव, ओंकार उवारे, बाळकृष्ण उबारे, संदेश उबारे, शैलेश गुरव, सुशांत भुरवणे, अनंत कळंबटे, संदीप घवाळी, क्रीडा शिक्षक अभिजीत कदम, मुख्याध्यापक शिवाजी बंडगर आणि सहकारी, संस्था पदाधिकारी व आजी-माजी विद्यार्थी यांनी मेहनत घेतली. स्पर्धेला मिळालेला खेळाडू व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि आयोजकांचे आयोजन यामुळे ही स्पर्धा कायमस्वरूपी स्मरणात राहील, अशी भावना पंचक्रोशीतून व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:06 PM 31/Dec/2024














