नॅशनल रायफल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोविंदराव निकम विद्यालयचा यश सावंत अव्वल

सावर्डे : नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यावतीने आयोजित ६७ वी रायफल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे पार पडली.

या स्पर्धेमध्ये सतरा वर्ष वयोगटाखालील रायफल इव्हेंटमध्ये सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेचा खेळाडू यश राजेश सावंतने रत्नागिरीचे प्रतिनिधित्व केले.

राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी यश याने डेरवण येथील जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत व गोवा येथे झालेल्या प्री नॅशनल रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये आपल्या खेळाची चमक दाखवून सर्वांचे लक्ष घेतले होते. गोव्यामध्ये झालेल्या प्री नॅशनल स्पर्धेमध्ये त्याने ४०० पैकी ३७४ पॉईंट मिळवून तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाला होता.

आता यश नॅशनल टू नॅशनल स्पर्धेत सहाशे पैकी ५९५ पॉईंट मिळवून क्वालिफाय झाला असून त्याला प्रख्यात नेमबाज व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले आहे.

नॅशनल स्पर्धेत सलग सहा राऊंडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून अव्वल ठरला व नॅशनलसाठी तो पात्र ठरला.

आमदार शेखर निकम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब भुवड, शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, सचिव महेश महाडिक, सर्व संचालक, पदाधिकारी, क्रीडा प्रबोधनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, सिद्धार्थ निकम, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:16 PM 31/Dec/2024