रत्नागिरी : जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ निराधार उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यात येतो. यावर्षी हा बाल महोत्सव ३ जानेवारी ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी स्टेडियम, मारुती मंदिर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी दिली.
या महोत्सवात संस्थाबाह्य (नगरपालिका शाळांमधील) मुलेही सहभागी होणार आहेत. बाल महोत्सवात क्रिकेट, खो-खो, कबडडी, गोळाफेक, लांब उडी, १०० मीटर धावणे, ४ x १०० मीटर रिले, कॅरम, बुद्धिबळ, निबंध, चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व, अशा क्रीडा स्पर्धा तसेच सामूहिक नृत्य, सामूहिक गायन, नाटीका, वैयक्तिक नृत्य, वैयक्तिक गायन आदी सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:46 PM 31/Dec/2024














