राजापूर : राजापूर तालुक्यातील ज्ञानदीप वाचनालय साखर या ठिकाणी वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत वाचन पंधरवडा ची सुरुवात क्रांतीज्योती आणि महिला शिक्षणाच्या पाया रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साखर आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ अर्जुन चव्हाण यांनी केली सुरुवातीला ग्रंथपाल श्री मनोहर धुरी यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
यानंतर वाचकांचे सामूहिक वाचन आणि मुलांचे प्रकट वाचन हे घेण्यात आले. या कार्यक्रमाला साखर विद्यालयाच्या मुलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी डॉक्टर श्री अर्जुन चव्हाण यांनी वाचन का करावे वाचनाची गरज महत्व या बाबत सविस्तर माहिती सांगितली.
यावेळी आरोग्य सेविका सौ ज्योती मांजरेकर, पोस्ट मास्तर श्रीमती ज्ञानेश्वरी सागावाकर, माजी उपसरपंच श्री रामचंद्र चव्हाण, सौ माधुरी मिरगुले, श्री प्रकाश तांबे, श्री एकनाथ चव्हाण, श्रीधर घाडी, सुधाकर भोसले, अजय भोसले, नागेश मिरगुले आणि साखर विद्यालयाचे विध्यार्थी उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार ग्रंथपाल श्री मनोहर धुरी यांनी मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:24 01-01-2025













