रत्नागिरी : जिल्ह्यात काढणार सहकार दिंडी

रत्नागिरी : सहकार वर्षानिमित्ताने सर्व राज्यभरात सहकार दिंडी काढण्यात येणार आहे.

ही दिंडी राज्यांतील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणार असून, रत्नागिरी जिल्ह्यातही या दिंडीचे स्वागत होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व पतसंस्था, पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते यांना एकत्र करून दिंडीचे नियोजन करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे व रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वामध्ये स्वागत समिती स्थापन करण्यात येणार आहे.

सन २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पतसंस्थांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्षभर करण्यात येणार आहे. याची सुरवात राज्य पतसंस्था फेडरेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमाला राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, सहकार आयुक्त डॉ. दीपक तावरे, अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, उपनिबंधक मिलिंद सोबळे व सर्व पतसंस्था फेडरेशनचे संचालक उपस्थित होते.
रत्नागिरीमध्ये पतसंस्थांचे संमेलनही होणार आहे. सहकार दिंडी व सहकार संमेलनामध्ये जास्तीत जास्त युवाशक्ती सहभागी होण्याचे व त्यांना सहकाराशी जोडण्याचे विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. या दिंडीचा समारोप शिर्डी येथील एका शानदार समारंभामध्ये ८ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

सरकार वर्षानिमित्त विविध कार्यक्रम
सन २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पतसंस्थांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्षभर करण्यात येणार आहे. याची सुरवात राज्य पतसंस्था फेडरेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाने झाली. वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 06-01-2025