रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचा प्रारंभ

रत्नागिरी : २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित झाले असून या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पतसंस्थांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्षभर करण्यात येणार आहे. याची सुरुवात राज्य पतसंस्था फेडरेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमाला राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष ड. दीपक पटवर्धन, सहकार आयुक्त डॉ. दीपक तावरे, अपर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, उपनिबंधक मिलिंद सोबळे व सर्व पतसंसथा फेडरेशनचे संचालक उपस्थित होते.

सहकार वर्षानिमित्ताने सर्व राज्यभरात सहकार दिंडी काढण्यात येणार आहे. ही दिंडी राज्यांतील सर्व जिल्ह्यामध्ये जाणार असून रत्नागिरी जिल्ह्यातही सदर दिंडीचे स्वागत होणार आहे. यासाठी रत्नागिरी जिल्हयातील सर्व पतसंस्था, पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते यांना एकत्र करून सदर दिंडीचे नियोजन करण्यासाठी मा. जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे व रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ड. दीपक पटवर्धन यांचे नेतृत्वामध्ये स्वागत समिती स्थापन करण्यात येणार आहे. या दिंडीनंतर रत्नागिरीमध्ये पतसंस्थांचे संमेलनही होणार आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 06/Jan/2025