रत्नागिरी : शिक्षण विभागाने केली शिक्षकांमध्ये पॉश कायद्याविषयी जागृती

माखजन : रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांना पॉश कायदा २०१३, या कायद्याची माहिती व्हावी, या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांतील शिक्षकांचे उद्बोधन करण्यात येत आहे. या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर कॉलेज, फाटक हायस्कूल, पटवर्धन हायस्कुल, जी. जी. पी. एस. या शाळांमधील शिक्षकांचे उद्बोधन झाले.

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ सुवर्णा सावंत व न्यायाधीश माणिकराव सातव यांनी एकत्रित आयोजन करत शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी विशाखा समितीची माहिती देण्यात आली. शाळांतर्गत असलेल्या विविध समित्या, आणि त्या समित्यांची कामे या विषयी सखोल माहिती देण्यात आली. पॉश कायदा महिलांच्या सुरक्षिततेसाठी किती महत्वाचा आहे, हे समजावून सांगण्यात आले. शाळा प्रशासन चालवताना शिक्षकांना पॉश कायद्यासह अन्य काही महत्त्वाच्या कायद्यांची माहिती असण्याची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

न्यायाधीश माणिकराव सातव यांनी शाळांतर्गत असलेल्या विविध समित्यांना किती महत्त्व व अधिकार आहेत हे सांगितले. यावेळीं शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशीच शिबिरे संपूर्ण जिल्ह्यात घेण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी माध्यमांना सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 06/Jan/2025

Shanti 4