रत्नागिरी : वनविभागाने चार गावात पकडले ७० हून अधिक वानर

पावस : वानर आणि माकडांच्या उपद्रवामुळे शेती आणि बागायतीचे होणारे नुकसान लक्षात घेऊन वनविभागाने त्यांना पकडण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी तालुक्यातील काजरघाटीसह टेंभ्ये, हातिस, शिवारआंबरे येथे वनविभागाने ७० हून अधिक वानरांना पिंजऱ्यात टाकले आहे.

या ठिकाणी भात शेतीबरीवर रब्बीसह आंबा, काजू, नारळ, सुपारीचे पीकही घेतले जात आहे. मात्र, वानरांच्या उपद्रवामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत, आंबा, काजूवरोवाच पापटा, कुळीथ, चवळी, केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान वानर करतात. त्यामुळे सोमेश्वर, गुरुमती, काळरघाटी येथील अनेक शेतकऱ्यांनी कडधान्य आणि भाजीपाला करणे सोडून दिले आहे. या वानरांच्या त्रासाला कंटाळून वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर काजरघाटी येथे ग्रामस्थांविरोधात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन पिंजरा लावण्याचे निश्चित केले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी नियोजन करून या वानरांना पकडण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काजरघाटी येथील देवजुवे येथे पिंजरा लावला होता. त्यामध्ये त्यांच्यासाठी खाद्यही ठेवले होते. दुपारपर्यंत सहा आणि सायंकाळपर्यंत पिंजऱ्यात १५ हून अधिक वानरांना पकडण्यात यश आले.

ही मोहीम विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, सहायक वनसंरक्षक प्रियांका लंगड, परिक्षेत्र वनअधिकारी प्रकाश सुतार, पाली वनपाल न्हावू गावडे, रत्नागिरी वनक्षक प्रभ साबणे, जाकादेवी वनरक्षक शर्वरी घेवडेकर, अनिकेत मोरे, महेश धोत्रे, विराज नागवेकर शहीद तांबोळी यांनी केली. त्यांना नारायण चव्हाण, प्रवीण पटवर्धन, दत्ताराम जाधव, कैलास पटवर्धन, भालवंड पवार आदींनी सहकार्य केले.

वानरांचा उपद्रव सुरूच
दम्यान, अद्यापही वानरांचा त्रास कमी झालेला नाही. वनविभागाने वानर पकडून नेल्यानंतरही त्यांचा उपद्रव या परिसरात सुरू आहे. आता आंबा, काजू कलमांना मोहोर आला असून कड़वा, पावट्याला फुले येऊ लागल्याने वानरांचा उपद्रव आणखी वाढली आहे. त्यामुळे या पिकाच्या सुरक्षेसाठी वानरांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. त्यासाठी वनविभागाने पुन्हा एकदा पिंजरा लावून वानर पकडावेत, अशी मागणी केली जात आहे.

गेल्या महिन्याभरात रत्नागिरी तालुक्यात ५० हून अधिक माकडं पकडण्यात यश आहे आहे. त्यामध्ये टेंभ्ये येथे ३० माकडे पकडली आहेत. त्याबरोबर हातीस, काजरघाटी, शिवारांबरे येथेही पिंजरा ठेवून माकडे पकडली आहेत. त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले जाते. – प्रकाश सुतार, प्रादेशिक वन अधिकारी, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:09 PM 06/Jan/2025