सावर्डे : मुलींना फुटबॉल सारख्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पालकांकडून प्रोत्साहन मिळावे अशी अपेक्षा, स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रतिनिधी प्रियांका विनोद अलिम यांनी व्यक्त केली. खेलो इंडियांतर्गत १३ वर्षांखालील वयोगटातील मुलींची जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
ही स्पर्धा सेंट थॉमस स्कूल येथे सुरू झाली. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांच्या हस्ते झाले. या वेळी प्रियांका विनोद आलिम, सेंट थॉमस स्कूलचे व्यवस्थापक फादर थॉमस, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन संचालक, धनराज मोरे, फुटबॉल असोसिएशन ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष प्रसाद परांजपे, जिल्हा फुटबॉल असोसिएशन ऑफ रत्नागिरीचे उपाध्यक्ष विनोद म्हस्के उपस्थित होते.
याप्रसंगी स्पोर्टस् अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून खेलो इंडिया सारख्या स्पर्धेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात फुटबॉल खेळाडूंना संधी प्राप्त करून दिल्याबद्दल रोहन बने यांनी धनराज मोरे आणि प्रसाद परांजपे यांना धन्यवाद दिले.

रत्नागिरी जिल्ह्यात फुटबॉल खेळाला विशेष प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन विजय शिंदे यांनी दिले. फुटबॉल असोसिएशन रत्नागिरीच्या वाटचालीबाबत माहिती विनोद म्हस्के यांनी दिली. याप्रसंगी आदित्य शेट्टी, श्रीतेज गावडे, कनक पवार या राज्यस्तरीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 06/Jan/2025














