चिपळूण : कापड दुकानाच्या गोडावूनमधून चोरी

चिपळूण : येथील बाजारपेठेतील युनायटेड क्लासिक कॉम्प्लेक्समधील तेजस गारमेंटमधील कापड दुकानात शनिवारी (ता. ४) सायंकाळी ४ वाजता चोरीचा प्रकार उघडकीस आला. या दुकानातील कामगार सुमारे ३० हजारांचा माल चोरत असताना मालकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी संबंधित कामगाराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मस्तकीम शब्बीर दाडेल असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याची फिर्याद इंद्रजितसिंह हरनामसिंह गलाटी (वय ६२) यांनी दिली आहे. शनिवारी तेजल गारमेट या कपड्यांच्या दुकानच्या गोडावूनमधील सुमारे ३० हजार २२८ रुपयांचे कपडे चोरताना आढळून आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 06/Jan/2025