चिपळुण : ५ पायांची गाय, बकासूर चे कृषी प्रदर्शनात आकर्षण

चिपळूण : चिपळुणात सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विशेषकरून पशुधन प्रदर्शनाकडे नागरिक आणि विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले आहे. (दि. ६) दुपारी राज्यात प्रसिद्ध बकासूर नावाच्या बैलाचे आगमन झाले. यावेळी या बकासुराला गर्दीने वेढले. सुरक्षेच्या गराड्यात आलेला बकासूर प्रदर्शनात लक्षवेधी ठरला.

चिपळूण नागरी पतसंस्था व वाशिष्ठी मिल्कच्यावतीने पाच दिवस चिपळुणातील सावरकर मैदानावर कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी देखील सकाळी चिपळूण व जिल्हाभरातील लोकांनी या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद दिला. विविध प्रकारच्या बैलगाड्यांचे प्रसिद्ध बैल, गजा रेडा, वेगवेगळ्या प्रकारच्या म्हशी, गायी या प्रदर्शनात लक्षवेधी ठरत आहेत. या शिवाय उंट, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, पक्षी, शोभेचे उंदीर लोकांचे आकर्षण ठरत आहेत. पाच पायांची गायदेखील या प्रदर्शनात आहे. या शिवाय या ठिकाणी केलेले कोकणी घर, गोठा, मचाण लक्ष वेधून घेत आहे.

रविवारी सायंकाळी वारकऱ्यांनी महोत्सवात रिंगण धरले आणि विठ्ठल नामाचा गजर केला. याचवेळी प्रशांत यादव यांचा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस देखील साजरा झाला. काल सकाळी पशुधन स्पर्धा झाली. त्यानंतर आयोजकांतर्फे चिपळुणातील पत्रकारांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. महोत्सवात पशुधन स्पर्धाही घेण्यात आली. दि. ९ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून (दि. १०) रोजी रात्री ८ वा. मराठी बाणा तर (दि. ९) रोजी रात्री ८ वा. नंदेश उमप यांचा मी मराठी हा बहारदार कार्यक्रम रंगणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 07/Jan/2025

Arihant 1