चाचा नेहरू बालमहोत्सवातून मुलांच्या सुप्तगुणांना वाव : न्या. एस. एस. गोसावी

रत्नागिरी : मुलांना केवळ बौद्धिक विकास करून चालणार नाही तर त्याबरोबरच शारीरिक, मानसिक विकासासाठी त्यांच्यामधील कला, क्रीडा, कौशल्य अशा सुप्तगुणांना वाव बालमहोत्सवाच्या माध्यमातून शासनामार्फत दरवर्षी केला जातो. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी आभार मानले.

मुलांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी त्याचबरोबर त्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक असा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे झाला. महोत्सवामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या सखेळाडूंना बक्षिसे देण्यात आली. यावेळी जिल्हा न्यायाधीश १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. अंबाळकर, दिवाणी न्यायदंडाधिकारी, वरिष्ठस्तर आर. एम. सातव, मुख्य न्यायदंडाधिकारी एन. जो. गोसावी, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव एम. आर. सातव शासकीय मनोरुग्णालय अधीक्षक डॉ. संघमित्रा पुले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा उपयुक्त डी. आर. शिंदे, राज्य कुर अधिकारी ए. डी. धाडगे, बाल न्यायमंडळ सदस्य अँड विनया घाग, बालकल्याण समिती सदस्य शिरीष दामले, अॅड. रजनी सरदेसाई आदी उपस्थित होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सातव यांनी संस्थेतील प्रवेशितांना लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा पुरवण्यासंदर्भात सहकार्य करण्याची ग्वाही दिली. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील पुरवठा निरीक्षक वानेश्वरी रेड्डी, रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अभय तेली, ऋषिकेश धनावडे व ऋतिक बागूल, आयटीआय कोर्स पूर्ण करून बालगृह व निरीक्षणगृहातून १८ वर्ष पूर्ण होऊन शिक्षण घेतलेल्या शासकीय अधिकारी व खासगी नोकरी करणाऱ्या यशस्वी मुला-मुलीचा सत्कार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 07/Jan/2025

Ratnagiri Khabardar add image