संगमेश्वर : बाजारपेठेतील घरात प्रवेश करीत बिबट्याने कुत्र्याची तीन पिल्ले पळविली आहेत. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी बिबट्या कॅमेर्यात कैद झाला होता. दोन दिवसांपूर्वी संगमेश्वर बाजारपेठेत भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या कॅमेर्यात कैद झाला होता. येथील सौरभ रसाळ यांच्या चारचाकीला असलेल्या कॅमेर्यात सदरचा बिबट्या कैद झाला आहे.
काही दिवस संगमेश्वर शहर तसेच संभाजी नगर भागात बिबट्याचा वावर सुरू असून पोटाची भूक भागविण्यासाठी मुक्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी भटकंती करताना काहींना त्याचे दर्शन सुद्धा झाले असल्याचे बोलले जात होते. एवढेच नव्हे तर शहरात वावरणार्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येतही घट झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:02 PM 07/Jan/2025














