सावर्डे : कोकरे, नायशी, वडेरू, कळंबुशी मार्गे ४० वर्षे नियमित धावणारी चिपळूण-कासे बसफेरी चिपळूण आगारातून बंद करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही बसफेरी पुन्हा सुरू होण्यासाठी २६ जानेवारी रोजी पालक आणि विद्यार्थ्यांनी चिपळूण आगारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

चिपळूण-कासे ही बसफेरी यापूर्वी चिपळूण आगारातून ४:४५ वा. सोडण्यात येत होती. सायं. ७ वा. ही गाडी कासे येथून कासे-मुंबई मार्गावर धावत होती. ही बसफेरी दोन वर्षांपासून पेढांबे व्हाया माखजन करण्यात आली. मात्र, पुरेशी प्रवासी संख्या नसल्याने चिपळूण आगारातून महिनाभरापूर्वी ही बसफेरी बंद करण्यात आली. या बसमधून असुर्डे, कोकरे, नायशी, वडेरू, कळंबुशी, कासे आदी गाव व परिसरातील विद्यार्थी सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण ससंस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. हे विद्यार्थी सावर्डे येथून सायंकाळी ५ वाजता परतीचा प्रवास करत असत. मात्र, गत एक महिनापासून ही फेरी बंद केल्याने त्यांची गैरसोय होत आहे. शेकडो पासधारक विद्यार्थ्यांना सावर्डे येथील एसटी निवारा शेडमधून पास दिले जात होते. मात्र, चौपदरीकरणाच्या कामामुळे ही शेड काढण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 07/Jan/2025












