खेड : ग्रामपंचायत दाखले देताना संबंधितांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी केले आहे. बांगला देशामधून येऊन कोकणात वास्तव्य करणाऱ्या लोकांकडे ग्रामपंचायतीपासून इतर अनेक यंत्रणांकडून दाखले सापडल्या प्रकरणी चिंता व्यक्त होत असताना ना. कदम यांनी याबाबत संबंधित विभागाला सूचना करणार असल्याचे सांगितले.
पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले की, खोटे दाखले परप्रांतीय लोकांकडे आढळून येणे ही गंभीर बाब आहे. ज्या देशातून हे लोक भारतात येतात, त्या देशाचा पासपोर्ट फाडून टाकून इथली नवीन डॉक्युमेंट बनवण्याकरिता ते प्रयत्न करीत असतात. त्यावेळी ते बनावट डॉक्युमेंट सादर करतात आणि रेशन कार्ड, आधारकार्ड, ग्रामपंचायतीत दाखले घेतात.
गैरमार्गाने मिळवलेले दाखले कोणाकडे आढळून आल्यास ते देणाऱ्यालाही जबाबदार धरले जाईल. हा देशाच्या संरक्षणाचा प्रश्न असल्यने मला वाटते. ही काळजी सर्वांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत संबंधित विभाग तसेच सूचनाही आम्ही देणार आहोत, असे गृहराज्य मंत्री (शहरी) योगेश कदम यांनी दिली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 08/Jan/2025












