साडवली : मार्लेश्वर यात्रेला येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची विशेष खबरदारी घ्या, अशा सूचना तहसीलदार अमृता साबळे यांनी सर्व विभागांना दिल्या. अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर तीर्थक्षेत्र हे स्वयंभू देवस्थान आहे.
यावर्षी श्री देव मार्लेश्वराचा यात्रोत्सव १३ आणि १४ जानेवारीला मकर संक्रातीला होणार असून, त्याच अनुषंगाने संगमेश्वर तालुक्याच्या तहसीलदार अमृता साबळे यांनी ६ जानेवारी रोजी तहसीलदार कार्यालयात आढावा बैठक घेतली. संगमेश्वर तालुक्यातील सर्वांसाठीच हे देवस्थान प्रार्थनीय आहेच, असे त्यांनी यावेळी उपस्थित सर्वांना संबोधित केले व सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
या बैठकीला निवासी नायब तहसीलदार सुरेश गोताड, देवरूख पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या अधिपत्याखाली सहायक पोलिस निरीक्षक मुजावर आणि त्यांचे सहकारी मावळकर, पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे महावितरणचे गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, एसटी विभाग, आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 08/Jan/2025











