रास्त भाव धान्य दुकानदारांच्या समस्या सोडवण्याकरिता पाठपुरावा करू : अशोकराव कदम
संगमेश्वर : रास्त दराच्या धान्य दुकानदारांच्या समस्या सोडवण्याकरिता शासनस्तरावर पाठपुरावा करून त्या सोडविण्याकरिता कटिबद्ध आहे, असे आश्वासन रेशन दुकान चालक- मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम दिले.
संगमेश्वर तालुका रास्त भाव दुकान चालक-मालक संघटनेच्या कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. या सभेला संगमेश्वर तालुक्यातून ८० रेशन दुकानचालक, मालक उपस्थित होते. संगमेश्वर जाखमाता मंदिर येथे ही सभा झाली. या सभेमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. दुकानदारांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यावर शासन आणि प्रशासन स्तरावर योग्य तो समनव्य साधून उपाययोजना करणे, संघटना मजबुतीकरण, सक्षमीकरण, अधिकारी वर्ग यांच्या सूचनांचे पालन आणि अंमलबजावणी तसेच दुकानदार यांची ग्राहकांप्रती कर्तव्य या विषयावर चर्चा झाली या सभेतील चर्चेत अनेक दुकानदारांनी सहभाग घेतला. आरंभी रोशन शिंदे यांनी सभेचा उद्देश स्पष्ट केला उपस्थित दुकानदारांनी चर्चेत सहभाग घेत आपापली मते नोंदवली आणि संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकारिणी बदलणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले.
संघटनेच्या अध्यक्षपदी रोशन शिंदे, तर उपाध्यक्षपदी साखरपा भडकंबा येथील अतुल शिंदे यांची निवड करण्यात आला. सचिवपदी संगमेश्वर येथील शंतनू शेट्ये, खजिनदारपदी संतोष खातू, तर कार्यकारिणी सदस्यपदी नंदन भागवत, कल्पेश शिंदे, शरद सावरटकर, विलास ओकटे, महंमद दसुरकर, विलास सावंत, साधना सुर्वे, नम्रता कांबळे यांची निमविरोध निवड झाली. संघटनेच्या सल्लागारपदी गंगाधर पंडित, लक्ष्मण पाचकले आणि मधुकर माने यांची निवड करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 08/Jan/2025











