‘नो शेठ, नो साहेब, ओन्ली भैय्या’ : आमदार किरण सामंत

रत्नागिरी ः राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक विकसनशील म्हणून राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचा नावलौकिक कसा होईल, याकडे पुढील पाच वर्षात प्रयत्न केला जाईल. विकासापासून कोणतेच क्षेत्र वंचित राहणार नाही, यावर आपला भर राहील. यापुढे ‘नो शेठ, नो साहेब, ओन्ली भैय्या’ हीच आपली ओळख मतदारसंघासह जिल्ह्यात राहील. कार्यकर्त्यांस मतदारांनी आपल्याला केवळ भैय्या म्हणूनच हाक मारावी, असे आवाहन राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी केले. वाढदिवसाचे औचित्य साधून ते पत्रकारांशी बोलत होते.

आमदार किरण सामंत यांचा 7 जानेवारीला वाढदिवस साजरा झाला. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघासह रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमाद्वारे आ.सामंत यांचा वाढदिवस साजरा केला. सोमवारी एक दिवस आधीपासूनच त्यांच्या मतदार संघातील विविध भागात कार्यकर्त्यांनी केक कापून व व कार्यक्रमांनी साजरा केला. मध्यरात्री बारा वाजेपयर्र्त किरण सामंत यांच्या भेटीसाठी कार्यकर्ते पाली येथील निवासस्थानी येत होते. पाली येथे त्यांचा जोरदार वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आई स्वरूपा सामंत, वडील रवींद्र उर्फ अण्णा सामंत, पत्नी, मुलगी अपूर्वा सामंत यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.

मंगळवारी सकाळी आ.सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी जिल्हा व राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर रत्नागिरी शहरातील बोर्डीग रोड येथील त्यांच्या कार्यालयात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य मतदार, अधिकारी, कर्मचारी यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

शुभेच्छा स्वीकारत असताना आ.सामंत यांनी विकासकामांची निवेदनही उपस्थित जनतेकडून स्वीकारली. यावेळी त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ न आणण्याचे आवाहन उपस्थितांना केले. दुपारनंतर आ.सामंत आपल्या मतदारसंघाकडे रवाना झाले. लांजा येथे झालेल्या कार्यक्रमाला त्यांचे बंधू राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे आवर्जुन उपस्थित होते. केक कापून त्यांनी ज्येष्ठ बंधू आमदार भैय्या सामंत यांचा वाढदिवस साजरा केला.

लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे अध्यक्ष ला गणेश धुरी, ला विशाल ढोकळे, ला अमेय वीरकर, एमजेएफ पराग पानवलकर, ला संजय पटवर्धन, ला रूपेश साळवी, ला सुमित ओसवाल उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 08-01-2025