गुहागर : तालुक्यातील पांगारी तर्फे वेळंब येथील वृद्ध महिला सुवर्णा शांताराम खांबे यांच्या राहत्या घराचे पावसाळ्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे मध्यरात्री घर कोसळून पूर्णतः नुकसान झाले होते. यामध्ये ती वृद्धा जखमी झाली होती. यानंतर नुकसानीचा पंचनामाही करण्यात आला. मात्र, आजतागायत ही महिला नुकसान भरपाईपासून वंचित आहे. त्यामुळे ‘कुणी घर देता का…’ असे म्हणण्याची वेळ या वृद्ध महिलेवर आली आहे.
जुलै महिन्याच्या अतिवृष्टीत मध्यरात्री घर कोसळल्याने घरामध्ये झोपलेल्या सुवर्णा खांबे यांच्या अंगावर घराचे दगड व सामान कोसळले होते. यामध्ये त्या जखमी झाल्या. दुसर्या दिवशी महसूल विभागाचे तलाठी व ग्रामसेवक यांनी भेट देऊन पुढील कार्यवाही सुरू केली. परंतु प्रशासनाकडून आर्थिक मदत त्यांना देण्यात आली नाही. मनसेतर्फे या वृद्ध महिलेला उपचारासाठी मदत देण्यात आली. या महिलेचे नातेवाईक घरकूल योजनेअंतर्गत घरासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 08-01-2025












