गुहागर : पांगारी तर्फ वेळंब येथे श्रमदानातून बांधले विजय बंधारे

गुहागर : पंचायत समिती गुहागर, ग्रामपंचायत पांगरी तर्फ वेळंब व ग्रामपंचायत अधिकारी संघटना, गुहागरच्यावतीने पांगारी तर्फे वेळंब ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात नदीवर दोन विजय बंधारे बांधून लाखो लिटर पाणी अडविण्यात आले आहे.

महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानाच्या माध्यमातून श्रमदानातून ग्रामस्थांनी तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सुमारे २० मीटर लांबीचे दोन विजय बंधारे बांधले. यावेळी पं. स.चे गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर, कृषी अधिकारी सर्जेराव कांबळे, कृषी विस्तार अधिकारी प्रतिक जाधव, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी शरद भांड, माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष बाबूराव सूर्यवंशी, पांगारी तर्फे वेळंबचे ग्रामपंचायत अधिकारी घेवडे, जाधव, क्षीरसागर ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्याच्या ३३० बंधारे बांधण्याच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत २११ बंधारे बांधण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:58 PM 08/Jan/2025

Radhakrushna patapedhi