गुहागर : महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वरतर्फे कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा व नवसंकल्पना वृद्धिंगत करणे या उद्देशाने रत्नागिरी जिल्हास्तरीय प्रकल्प २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयाने व्हेईकल सेफ्टी सिस्टीमचा ‘सेफ्टी गॉगल’ प्रकल्प सादर करून प्रथम क्रमांक मिळविला.
आरुष हेरवाडे, शुभम पडवळकर, दुर्वांक कीर व अथर्व विचारे या विद्यार्थ्यांनी व्हेईकल सेफ्टी सिस्टीमचा सेफ्टी गॉगल सादर करून रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक संपादन केला. पाटपन्हाळे कनिष्ठ महाविद्यालयाला रोख रक्कम सात हजार व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. प्रा. मयेकर, प्रा. बेलवलकर, प्रा. साळवी आदींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. गौरव समारंभासाठी वेळणेश्वर अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी, उपप्राचार्य अविनाश पवार, संगणक अभियांत्रिकी विभागाचे प्रा. केतन कुंडिया, स्पर्धा समन्वयक डॉ. गणेश दिवे, प्रा. सतिश घोरपडे आदी उपस्थित होते.
या यशाबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ, सचिव सुधाकर चव्हाण व पदाधिकारी, मुख्याध्यापक व्ही. डी. पाटील, पर्यवेक्षक जी. डी. नेरले आदींनी अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 08/Jan/2025












