गुहागर : महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिनाच्या (पोलिस रेझिंग डे) अनुषंगाने गुहागर पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी गुहागर पोलिस परेड मैदान व समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानामध्ये तीन किलोमीटर समुद्रकिनाऱ्याची साफसफाई करण्यात आली. स्वच्छता अभियानामध्ये गुहागरमधील सामाजिक संस्था लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी, जीवनश्री प्रतिष्ठान, गुहागर तालुका पत्रकार संघ, तसेच नगरपंचायत गुहागर, सर्व पोलिस कर्मचारी व होमगार्ड, रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक, श्री देव गोपालकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमधील विद्यार्थी, शिक्षक, मँगो व्हीलेज गुहागर, एनसीसी पथकाने सहभाग घेतला. समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता गुहागर नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी करतात. परंतु नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक गुहागरमध्ये आले होते. त्यामुळे समुद्रकिनारी अस्वच्छतेचे प्रमाण वाढले होते. पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांचे यासाठी मार्गदर्शन लाभले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:12 PM 08/Jan/2025












