लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलाय का हे तपासायला छाननी होणार : ना. योगेश कदम

खेड : लाडकी बहीण ही योजना गरीब बहिणीसाठी असून जर कोणी फोर व्हीलर असताना या योजनेचा लाभ घेतला असेल तर ते छाननी करून तपासावे लागेल. परंतु त्यामुळे कोणावर अन्याय होणार नाही. त्याचा विचार विरोधकांनी करण्याची गरज नाही, असा टोला गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांनी येथे लगावला.

लाडकी बहीण योजनेच्या छाननी करून विरोधक सरकारवर निशाणा साधत असून त्यांच्या टीकेला गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांनी उत्तर दिले आहे.

ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये कोणी फोर व्हीलर गाडी असलेले, शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेले अशा महिला नाहीत याचा शोध घेण्यासाठी अर्जाची छाननी तर करावी लागेलच. परंतु याचा अर्थ कोणाला या योजनेपासून वंचित ठेवण्याचा विचार सरकार करत आहे असे नाही. योजना खरोखर ज्यांना गरज आहे त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार सक्षम असून विरोधकांनी त्याचा विचार करू नये, असे ते म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 09/Jan/2025

Physciobot