गोळप फाटा येथील टॉवरच्या बॅटऱ्या चोरीस

रत्नागिरी : तालुक्यातील गोळप फाटा येथील टॉवरच्या २४ बॅटऱ्या, २० लिटर डिझेल आणि फ्रैंकर असा एकूण ५३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लांबवला. चोरीची ही घटना सोमवार ६ जानेवारी रोजी सकाळी १० ते मंगळवार ७ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत सुहास दत्ताराम चव्हाण (४४, रा. गवाणे गवळीवाडी लांजा, रत्नागिरी) यांनी पूर्णगड पालिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, फिर्यादी सुहास चव्हाण हे या टॉवरच्या बॅटऱ्यांच्या देखभालीचे काम करतात. हा इंडस कंनीचा टॉवर असून त्यावर एअरटेल, जिओ, वोडाफोन कंपनीचे नेवटर्क आहे. टॉवरला पॉवर देण्यासाठी २.२ व्होल्टेजच्या बॅटऱ्या ठवलेल्या होत्या. अज्ञाताने या पत्र्याच्या केबीनच्या दरवाजाचे कुलूप तोडून त्यातील ४८ हजार रुपयांच्या २४ बॅटऱ्या २ हजार रुपयांचे २० लिटर डिझेल असलेला कॅन आणि ३ हजार रुपयांचा पॉवर क्रैकर चोरुन नेला. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 09/Jan/2025