डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा सुशोभिकरण नावाखाली उपद्व्याप नको : दीपक पवार

लांजा : रत्नागिरी जिल्हा ग्रामीण रूग्णालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. निवडणुकपूर्वी अचानक पुतळा स्थलांतरित केला गेला आणि ६ डिसेंबरपूर्वी पुन्हा प्रतिस्थापित करण्यात आला. या ठिकाणी मोठ्या उंचीचा नवीन पुतळा उभारण्यात येतो की काय, असे लोकांचा समज होता मात्र तोच पुतळा पुन्हा बसविण्यात आला. चौथरा मात्र दीड फुटांनी वाढविण्यात आला एवढाच काय तो फरक असावा मग हा उपद्व्याप कशासाठी, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दीपक पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्याला चांगल्या प्रतिचा मार्बल किंवा ग्रेनाईट लावायला हवा होता. तो न लावता पार्टेक्सच्या लाह्या लावण्यात आल्या आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या सभोवताली म्हणावे तसे सुशोभिकरण झालेले नाही. सुशोभिकरणाची मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे, असेही पवार यांनी पत्रकात नमूद केले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या शेजारी सुशोभिकरणाच्या नावाखाली त्यांच्या जीवनातल्या काही घटनांचे शिल्पही बसविण्यात आले आहेत. हे शिल्प कंपाऊंडच्या बाहेर भिंतीत बसविण्यात आलेले असल्याने त्यावर कचरा उडत असतो. ते प्रसंगाचे शिल्प आतल्या बाजूला बसविणे गरजेचे होते. हे सर्व ठेकेदाराच्या फायद्यासाठी की स्वतः क्रेडिट घेण्यासाठी केलेला आहे, असा सवाल करून बौध्द समाजातल्या गटातटाच्या राजकारणाचा, धम्मकारणाचा व समाजकारणाचा फायदा सत्ताधारी घेत आहे कि, असा आरोप दीपक पवार यांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 09/Jan/2025