आमदार शेखर निकमांच्या पाठपुराव्यामुळे नायरीत रस्त्याचे सर्व्हेक्षण

कडवई : बहुचर्चित असलेल्या नायरी निवळी नेरद ते पाटण सातारा घाट फुटण्याचे स्वप्न नायरी पंचक्रोशीतील जनता अनेक वर्षे पाहत होती. आमदार शेखर निकम यांनी गेली पाच वर्ष सतत पाठपुरावा करून सर्व्हेक्षण करण्यासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर देखील करून घेतले.

सर्व्हे कधी होईल याची प्रतीक्षा करत असताना नायरी येथील प्रचार सभेत त्यांनी याबाबत शब्द दिला होता. निवडणूक संपताच नजीकच्या दोन ते तीन महिन्याच्या आत त्याची वर्क ऑर्डर निघेल, असा शब्द आमदार निकम यांनी दिला होता. आणि त्याची वचनपूर्ती करतानाच सर्वेक्षण करण्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण घेवून त्याची वर्क ऑर्डर डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून सर्वे करण्याचा मार्ग सुखकर झाल्याचे समाधान पंचक्रोशीतून व्यक्त होत आहे. या रस्त्याचे सर्व्हेक्षण करण्यासाठी गावात समिती देखील दाखल झाली. यामुळे आमदार निकम यांच्या कार्यपध्दतीवर ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करत निकम यांचे आभार मानण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 09/Jan/2025