रत्नागिरी : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये संचिता वरवटकर १०० मीटर मध्ये प्रथम

खंडाळा : जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग अंतर्गत पंचायत समिती रत्नागिरी शिक्षण विभाग आयोजित वर्ष २०२४-२५ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये तालुक्यातील एकूण ६ बिटच्या स्पर्धा पार पडल्या.

त्यामध्ये गणपतीपुळे बिटची वाटद मिरवणे केंद्रा मधील रायवाडी शाळेतील कु. संचिता विनोद वरवटकर हिने १०० मीटर धावणे यामध्ये प्रथम पारितोषिक मिळवले शाळेचे मुख्याध्यापक सागवेकर सर उप शिक्षक प्रतीक माने शिक्षणतज्ञ नितीन झगडे व उपाध्यक्ष नूतन उदय रहाटे व वाटद पंचक्रोशी मधील पालकवर्ग हयांच्या कडून तिचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 09-01-2025