राजापूर : हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे १७ जानेवारी पासून शिवस्मरण यात्रा गडकोट मोहीम

राजापूर : राजापूर येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने शिवस्मरण यात्रा गडकोट मोहीम १७ ते १९ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये किल्ले पुरंदर, लेण्याद्री गणपती मंदिर, किल्ले शिवनेरी व नाणेघाट यांचा समावेश आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ऐतिहासिक गडदुर्गांना भेटी देऊन तेथील इतिहास जाणून तो तरूणाईला अभ्यासता यावा, अनुभवता यावा या उद्देशाने आखलेल्या असतात, असे प्रमुख आयोजक महेश मयेकर यांनी सांगितले. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने या गडदुर्ग भेट, पाहणी व अभ्यास या गडकोट मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक शिलेदारांना मोहिमेचे नियम व शिस्त, जबाबदारी पाळणे अत्यावश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 09/Jan/2025

Radhakrushna patapedhi