चिपळूण : डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयात वाचन कौशल्य विकास कार्यशाळा

रामपूर : मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत वाचन पंधरवडा दि. १ ते १५ जानेवारीपर्यंत साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने वाचन कौशल्य विकासावर कार्यशाळा झाली. याकरिता कै. सौ. कमलाबाई वामन पेठे कनिष्ठ महाविद्यालय मार्गताम्हाने येथील प्रा. भारती भोसले या प्रमुख मार्गदर्शिका म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब यादव यांनी प्रा. भोसले यांचे स्वागत केले. सहाय्यक प्रा. विक्रांत टेरवकर यांनी आभार मानले. कार्यशाळेला महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेचे यशस्वी आयोजन ग्रंथपाल अनिल कांबळे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 09/Jan/2025

Arihant 3