एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय : राजेंद्रकुमार राजमाने

चिपळूण : एसीबी इंटरनॅशनल स्कूलमधून अॅड. अमोल भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य देशांमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धती मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भोजने वैयक्तिक लक्ष देऊन मुलांमध्ये शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये लक्षणीय कामगिरी करीत आहेत, अशा शब्दांत उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी भावना व्यक्त केल्या.

चिपळूण शहरानजीक कापसाळ येथील एसीबी इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी डीवायएसपी राजमाने बोलत होते. सध्याच्या युगात वाढते सायबर क्राईम लक्षात घेता पालकांनी आपल्या मुलांवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे. सायबर क्राईम, मोबाईलवरील फेक जाहिराती आणि अश्लील वेबसाईट यामुळे मुलांची फसवणूक होत आहे. आपली मुले मोबाईलवर काय पाहत आहेत, कोणती साईट उघडत आहेत याची परिपूर्ण काळजी पालकांनी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन राजमाने यांनी केले.

यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, युवानेते अनिरुद्ध निकम, चिपळूण अर्बन बँक अध्यक्ष मोहन मिरगल, सतीश खेडेकर, अॅड. अमोल भोजने, उद्योजक चंद्रकांत भोजने, डॉ. राकेश चाळके, राकेश टिळक, एसीबी इंटरनॅशनल स्कूल चेअरमन सायली भोजने, संजय जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते. अॅड. अमोल भोजने यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:31 PM 09/Jan/2025