Breaking : लाच घेताना सरकारी वकिलाला रंगेहाथ पकडले; रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ

चिपळूण : सरकारी वकिलाला लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता. खेड, जि.रत्नागिरी यांना तक्रारदार यांचेकडुन लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांनी ताब्यात घेतले आहे.

बुधवारी संध्याकाळी चिपळूण येथील ओयासीस हॉटेल, चिपळूण येथे दिनांक ०९/०१/२०२५ रोजी १९.१७ वाजता रंगेहाथ पकडण्यात आलेले असून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता.खेड, जि. रत्नागिरी यांनी ५,००,०००/- रुपये मागणी केलेली लाच रक्कम होती. तर १,५०,०००/- रुपये इतकी लाच रक्कम स्विकारली.

आरोपी ची उलट तपासणी न करण्यासाठी मागितली लाच!

याबाबत सविस्तर असे, की यातील तक्रारदार यांनी घरडा कंपनीच्या केसमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वर्ग १, खेड यांचे न्यायालयात वकील पत्र घेतलेले आहे. सरकार पक्षाच्यावतीने सदरची केस श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता हे पाहत होते. दिनांक २६/१२/२०२४ व दिनांक ०३/०१/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक राजेश जाधव यांनी तकारदार यांच्याकडे साक्षीदारांना शिकवणार नाही, तुमची केस कशी सुटेल असे प्रयत्न करेन, जास्त सरतपास न घेता महत्वाचे मुददे वगळून आरोपी निर्दोष कसे सुटतील व केस लवकर संपवायला मदत करण्यासाठी ५,००,०००/- रुपयांची मागणी करुन त्यापैकी पहिला हप्ता म्हणुन १,५०,०००/- रू. स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झालेले होते.

त्यानंतर दिनांक ०९/०१/२०२५ रोजी सापळ्याचे आयोजन करुन लोकसेवक राजेश जाधव यांना तक्रारदार यांचेकडुन १,५०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना ओयासीस हॉटेल, चिपळूण येथे दिनांक ०९/०१/२०२५ रोजी १९.१७ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांनी ताब्यात रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे.

सदर कारवाई यांच्या मार्गदर्शना खाली ही कारवाई करण्यात आली.
१) मा.श्री. शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.

२)मा.श्री. संजय गोवीळकर अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.

३)मा.श्री. गजानन राठोड, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.

४) मा.श्री.सुहास शिंद्र, अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.

५)मा. श्री अविनाश पाटील, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्यूरो, रत्नागिरी

अॅन्टी करप्शन ब्युरो, रत्नागिरी तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणताही शासकिय अधिकारी/कर्मचारी किंवा त्याचे वतीने साजगी इसम लाचेची मागणी करीत असतील तर कृपया अॅन्टी करप्शन ब्युरो, रत्नागिरी कार्यालयाशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 10-01-2025