चिपळूण शहरात रॅलीतून रस्ता सुरक्षेचा संदेश

चिपळूण : वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, आपली सुरक्षा हीच कुटुंबाची सुरक्षा यांसारख्या घोषणा देत चिपळूण आगारातील अधिकारी, कर्मचारी व पोलिसांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहरातून जनजागृतीपर रॅली काढली.

एसटी महामंडळाकडून १ ते ३१ जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने रस्तासुरक्षेविषयी बसस्थानक ते पाग पॉवरहाउसदरम्यान रॅली काढली. एसटी कर्मचाऱ्यांनी हातात सुरक्षित वाहतुकीबाबतचे संदेश देणारे फलक हाती घेतले होते. प्रवाशांना विनाअपघात सेवा मिळण्यासाठी एसटी महामंडळाच्यावतीने विविध उपाययोजना राबवण्यात येतात. विनाअपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा गौरव केला जातो. अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी ही जनजागृती फेरी काढण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 10/Jan/2025

Amey jwelrs