गुहागरच्या पोलिस निरीक्षकांच्या बदलीवर अडूर बौद्धजन संघ ठाम

गुहागर : गुहागरच्या पोलिस निरीक्षकांच्या बदलीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. २६ जानेवारीपर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही उपोषणाला बसणार आहोत, अशी माहिती बौद्धजन सहकारी संघ, अडूर (स्थानिक) शाखा क्र. ४० च्या पदाधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषदेत दिला.

पोलिस प्रशासनाने धम्मचक्र प्रवर्तन दिन व महापरिनिर्वाणदिनी बौद्ध विहारला टाळे ठोकणे, सशस्त्र पहारा ठेवणे, पूजापाठापासून वंचित ठेवणे असे आरोप या पदाधिकाऱ्यांनी केले असून, पोलिस निरीवाकांकडे अंगुलीनिर्देश केला आहे. पत्रकार परिषदेला वैभव पवार, संदीप पवार, रामदास पवार गुरुजी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 AM 10/Jan/2025