खेड : तालुक्यातील धामणंद पंधरागाव विभागातील तळवटपाल गावात सोमवार दि. ६ रोजी सायंकाळी ४.४० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकून १ हजार १२० रुपये किंमतीच्या १० लिटरचे रसायन व साहित्य जप्त केली आहे. गावातील एका लाकडाच्या खोपटाच्या पाठीमागच्या मोकळ्या जागेत सुरु असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारुच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रवीण कृष्णा खांबे यांनी धाड टाकली. संशयीत आरोपी सुदेश अशोक पालांडे उर्फ बाळा (४० रा. तळवटपाल, गावठाणवाडी ता. खेड जि. रत्नागिरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 10/Jan/2025














