रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील पालवणी गोसावीवाडी येथे जावयानेच सासूचे १ लाख ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र लांबवले. ही घटना शुक्रवार दि. ३ जानेवारी रोजी दुपारी ३ वा. सुमारास घडली आहे.
समीर शंकर गोसावी (रा. माणगाव, जयगड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. त्याच्या विरोधात सासरे शिवाजी पांडूरंग नवघरे (५४, रा. गोसावीवाडी, पालवणी मंडणगड, रत्नागिरी) यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार, शुक्रवारी दुपारी फिर्यादी शिवाजी नवघरे यांची पत्नी आणि संशयित समिर गोसावीची सासू ही गावातील बचत गटाच्या मिटिंगसाठी गेली होती. या संधीचा फायदा उठवत समिरने त्यांच्या बेडरुममधील कपाट उघडून त्यात ठेवलेले दोन ताळ्याचे १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरुन नेले. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 10/Jan/2025













