चिपळूण : जुगार अड्ड्यावर धाड टाकून मुद्देमाल जप्त

चिपळूण : येथील रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर गांधारेश्वर मंदिराच्या तिठ्याजवळील परेश कदम याच्या घराशेजारील पडवीमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी रात्री १:२० वाजता धाड टाकून मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी रमेश लक्ष्मण कदम (५८, ओझरवाडी, चिपळूण) याकुब सयदु शहा (४१, फकीरमोहल्ला गुहागरनाका, चिपळूण), किसन जगन्नाथ खंडजोडे (५५, मुरादपूर, रामोशीवाडी, चिपळूण), समीर चंद्रकांत भिसे (२५, मुरादपूर, चिपळूण), परेश प्रमोद कदम (३०, शंकरवाडी, चिपळूण) यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस नाईक रोशन शंकर पवार यांनी फिर्याद दिली आहे. पाचजण गैरकायदा बिगरपरवाना पत्त्यांचा जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडून ३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 10/Jan/2025