मंडणगड : नगर पंचायतीने विकासकामाना निधी मंजूर केल्याने मंडणगड शहरातील दुर्गवाडी येथील कुणबी भवन परिसरातील संरक्षक भिंत, गटार व परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याचे कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. माजी सभापती भाई पोस्टुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश शिगवण, नगरपंचायत बांधकाम सभापती मुकेश तलार आदींच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी नगरसेवक सुभाष सापटे, कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष दीनेश साखरे, सेक्रेटरी विजय ऐनेकर, सल्लागार रघूनाथ पोस्टुरे, सुरज पाडवे, गणेश सावर्डेकर, ठेकेदार राम पवार, ग्रामस्थ सुहास घोलप, पप्पू यादव, श्री घाणेकर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:43 PM 10/Jan/2025













