रत्नागिरी : औद्योगिक विकासातून रोजगार निर्मितीसाठी माझे काम सुरु – खासदार नारायण राणे

रत्नागिरी : रत्नागिरीच्या विकासाच्या दृष्टीने मी काम करत असून औद्योगिक विकासातून रोजगार या दृष्टीने काम सुरु असल्याचे प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

तर कोणत्या भागात कोणती इंडस्ट्री उभारावी याबाबतीत उदय सामंत आणि माझ्यात चर्चा झाली असल्याचेही ते म्हणाले.

भाजपच्या संघटन पर्व आढावा अभियानाला खा. राणे रत्नागिरीत आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना खा. राणे म्हणाले कि, आमचा पक्ष दिल्लीत आणि राज्यात मोठा पक्ष आहे आणि जागतिक पातळीवरही मोठा पक्ष आहे. तो आणखी मोठा पक्ष बनवावा यासाठी आम्ही नोंदणी करत आहोत. यासाठीच हे अभियान आहे. भारतीय जनता पक्षात येण्यासाठी लोक उत्सुक आहेत. भविष्यात निवडणूका आम्ही स्वबळावर लढवू, कोणती राज्यातली का दिल्लीची ते सांगत नाही असेही खा. राणे म्हणाले. आगामी पक्ष प्रवेशाबद्दल बोलताना ते म्हणाले कि आणि जर काहीजण मार्गात असतील तर पक्ष विचार करेल. भाजपचे चांगले दिवस आहेत, प्रवाह त्या दिशेने वाहत चालला आहे, भाजपचं चांगलं काम होतंय, विकास दिसतोय लोकांना, त्यामुळे लोकांना भाजप चांगला पक्ष आहे, सेफ आहे असे वाटते असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस संस्थापक शरद पवार यांनी आरएसएसने कौतुक केले आहे. यावर भाष्य करताना ते म्हणाले कि त्यात वावगे काही नाही. चांगल्याला आपण चांगलेच म्हणत असतो. तर मुंबई महानगरपालिका भाजप स्वबळावर लढवेल इतकी भाजपची मुंबईत ताकद आहे असेही खा. राणे यावेळी म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 11-01-2025