सावर्डे : मुहूर्त नसल्याने कोणतेही शुभकार्य पौष महिन्यात केले जात नाही, अशी पूर्वापार समाजात रूढी, परंपरा आहे; मात्र याला फाटा देत आंबवपोंक्षे (ता. संगमेश्वर) येथील सुरेश जुवळे यांनी मुलाचा जन्म पौष महिन्यात झाल्याने त्या दिवसाचे औचित्य साधून वाढदिवसानिमित मुलाला घर बांधून भेट दिले. या घराचा गृहप्रवेश पौष महिन्यात केला.
समाजनेते सुरेश भायजे यांच्या हस्ते फीत कापून गृहप्रवेश केला. यावेळी सम्राट बळीराजाची महापूजा घालण्यात आली. सम्राट बळीराजा या विषयावर माजी सभापती नारायण भुरवणे यांनी बळीराज्यात शुभ-अशुभ असा भेदभाव न करता सम्राट बळीराजाने कशा प्रकारे जनतेच्या हिताचे राज्य केले, तो सारा इतिहास पुराव्यानिशी लोकांसमोर सादर केला. बळीराज सेनेचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष नितीन लोकम यांनी सर्व महापुरुषांबाबतची सविस्तर माहिती दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 11/Jan/2025












