गुहागर : वेळणेश्वर महाविद्यालयाला मिळाले राष्ट्रीय विद्यापीठाचे नॅक मानांकन

गुहागर : तालुक्यातील विद्या प्रसारक मंडळ ठाणेचे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर महाविद्यालयाला राष्ट्रीय विद्यापीठाचे नॅक मानांकन मिळाले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद यांनी ९ व १० डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय समितीने या महाविद्यालयाचे सर्वेक्षण आणि मूल्यांकन केले होते.

महाविद्यालयातील अभ्यासक्रम, अध्यापन, अध्ययन, परीक्षा मूल्यांकन, संशोधन, विस्तारकार्य, मूलभूत सुविधा व विद्याथों साह्य व प्रगती, प्रशासकीय नेतृत्व व व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्य व नावीन्यपूर्ण उपक्रम, आदीची पाहणी करून ‘नॅक’ समितीने ‘बी प्लस’ हा दर्जा बहाल केला आहे. गुहागर तालुक्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय असलेल्या या महाविद्यालयात स्थापत्य

अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, मेकॅनिकल अभियांत्रिकी, इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स या सहा विभागांचा समावेश आहे. महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापनेपासून कमी कालावधीत नॅकचे ‘बी’ मानांकन प्राप्त करणारे मुंबई विद्यापीठातील एकमेव महाविद्यालय होते.

यावेळी दुसऱ्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील नॅक ‘बी प्लस’ मानांकन मिळाले आहे, अशी माहिती राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल विकसित करणाऱ्या विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.

महाविद्यालयाला मिळालेले नॅक मानांकन हे आमच्या संस्थेसाठी मोठा बहुमान आहे. त्यामुळे आता येथील शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जा कायम राखण्याची मोठी जबाबदारी आली असून, आणखीन आधुनिक करण्यासाठी प्रयत्न आणि योगदान देण्याची महत्त्वाची जबाबदारी आहे. – डॉ. नरेंद्रकुमार सोनी, प्राचार्य

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 11/Jan/2025