राजापूर : पेंडखळेत १३ व १४ जानेवारी रोजी श्री भवानी देवीचा वार्षिक यात्रोत्सव

राजापूर : तालुक्यातील मौजे पेंडखळे गावची ग्रामदेवता श्री भवानी देवीचा वार्षिक यात्रोत्सव पौष पौर्णिमा सोमवार दि. १३ जानेवारी व व मंगळवार १४ जानेवारी रोजी साजरा होत आहे. नवसाला पावणारी म्हणून देवीची सर्वत्र ख्याती असून प्रतिवर्षी यात्रेला भाविकांची मोठी गर्दी होत असते.

रात्रौ १२ वाजता पोत पाजळण्याचा कार्यक्रम होईल व नंतर श्री सिद्धिविनायक नमन मंडळ भू, मधलीवाडी यांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होणार आहे.

तरी भाविकांनी दर्शनाचा व तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन पेंडखळे ग्रामस्थ मंडळातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:18 11-01-2025