रत्नागिरी : रत्नागिरी खबरदार आयोजित वुमेन्स कार्निव्हल २०२५ ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दररोज या कार्निव्हल मध्ये ग्राहकांना ४० हजारांची आकर्षक बक्षिसे देण्यात येतात. या शिवाय दररोज ५ हजार पेक्षा जास्त खरेदी करणाऱ्या महिला ग्राहकाला ‘शॉपिंग क्वीन’ म्हणून घोषित करण्यात येते. या शॉपिंग क्वीन ला देण्यात येणाऱ्या बक्षिसाचे प्रायोजक आहेत सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे.
तिसऱ्या दिवशी दिवशी ५ हजार पेक्षा जास्तची खरेदी करून नेहा सागवेकर या शॉपिंग क्वीन ठरल्या आहेत. त्यांना सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांच्याकडून ७००० रुपयांची प्रवासी बॅग, क्राऊन आणि बेल्ट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी यामिनी मलुष्टे, प्रियांका मलुष्टे देखील उपस्थित होत्या. कार्निव्हल मध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दररोज ४० हजारांची बक्षिसे देण्यात येतात. काल पासून सुरु झालेल्या वुमेन्स कार्निव्हल ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.













